Latest Marathi News
Ganesh J GIF

पुलावरून लोखंडी जाॅब अंगावर पडल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

थरारक आणि विचित्र अपघाताचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, धक्कादायक कारण समोर

भोसरी – पिंपरी चिंचवडच्या भोसरीतील पुलावर एका टेम्पोचा अपघात झाला अन त्यातील लोखंडी जॉब पुलाखाली आले. काही कळण्याआधी पुलाखालून निघालेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावर हे लोखंडी जॉब पडले. अपघातात हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

भोसरी येथील छावा चौकाजवळच्या फ्लायओव्हरवर एका टेम्पोचा थरारक अपघात झाला आणि त्यातील लोखंडी सामान थेट खाली रस्त्यावर कोसळलं. दुर्दैवानं ते सामान थेट एका बाईकस्वारावर कोसळलं आणि तो गंभीर जखमी झाला. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे. टेम्पो प्रचंड वेगात फ्लायओव्हरवरून जात असताना अचानक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. क्षणात टेम्पो उलटला आणि त्यात भरलेलं जड लोखंडी सामान खाली रस्त्यावर आलं. त्याच वेळी खाली रस्त्यावरून बाईकवरून जात असलेला युवक या भीषण दुर्घटनेत सापडला. ते सामान त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर कोसळल्यानं, तो गंभीर जखमी झाला. नागरिकांनी धाव घेत जखमी युवकाला तातडीन जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. सुरुवातीला पोलिसांनी संथ गतीने कार्यवाही केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली होती.

 

टेम्पोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात चालकाने बेपर्वाईने, वेगात टेम्पो चालवल्याचं उघड झालं आहे. नागरिकांनी बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई करून, जड वाहनांवर निर्बंध घालण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!