Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात मिक्सर ट्रकने ११ वर्षांच्या मुलीला चिरडले

अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, जड वाहनांना बंदी असतानाही वाहने रस्त्यावर, पोलिसांचे सपशेल दुर्लक्ष

पुणे – हिंजवडी फेज २ परिसरातील इन्फोसिस सर्कलजवळ जड वाहनांना मनाई असलेल्या वेळेत मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील ११ वर्षीय मुलगी मृत्युमुखी पडली असून तिची आई गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.

मृत्यू झालेल्या मुलीचे नाव प्रत्युषा संतोष बोराटे असे आहे, तर तिची आई वैशाली बोराटे या गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी सागर सुभाष आगलावे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मिक्सर ट्रकचालक फरहान मुन्नू शेख याला अटक केली आहे. प्रत्युषा आईसोबत गणपतीचे बुकिंग करण्यासाठी जात होती. दोघीही दुचाकीवरून जात होत्या. यावेळी सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर प्रत्युषा रस्त्यावर पडली. यावेळी ट्रकच्या मागच्या चाकाखाली ती चिरडली गेली. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालविलेल्या मिक्सर ट्रकने थेट दुचाकीला जोरात धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की प्रत्युषाचा जागीच मृत्यू झाला, तर वैशाली बोराटे गंभीर जखमी झाल्या. दरम्यान पुण्यात वाहतुकीचं पालन न करता बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, मात्र यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे, तर कधी यामध्ये बळी देखील जात आहेत.

 

हिंजवडी परिसरात सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी चार ते नऊ या वेळेत जड वाहनांच्या वाहतुकीस मनाई आहे. आता या अपघातानंतर आरोपीविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या बाबतचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!