Latest Marathi News
Ganesh J GIF

विद्येचे प्रांगणात तरूणीचा अश्लील डान्स आणि हावभाव

तरूणीचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, शाळेसोबत राजकीय कनेक्शन, चर्चांना उधाण

बारामती – बारामतीतून धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून नागरिकांमधून सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला जात आहे. बारामती तालुक्यातील मोरगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मनोरंजन कार्यक्रमात अश्लीलता दिसून आली आहे.

रयत शिक्षण संस्थेअंतर्गत राज्यात अनेक ठिकाणी विद्यालयं चालवली जातात. ही राज्यातील एक नावाजलेली संस्था आहे. त्याअंतर्गत बारामती तालुक्यातील मोरगावमध्ये मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चालवलं जातं आणि याच विद्यालयाच्या प्रांगणात हा मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ मे महिन्यातील असून गावच्या ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मनोरंजनाच्या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाचा आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संताप व्यक्त केला जात आहे. कार्यक्रमाचा व्हिडिओ हा तीन महिन्यानंतर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यात एक तरुणी अंगविक्षेप करत लावणी सादर करताना दिसत आहे. गावपरंपरेनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून विद्यालयाच्या प्रांगणात ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात घेतले जातात, त्या मनोरंजन कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. यात विद्यालय आणि शैक्षणिक संस्थेचा कसलाही सहभाग नसल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे यांनी म्हटले आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षीही मोरगाव ग्रामस्थांचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त यात्रा कमिटी यांच्या वतीने विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ६ ते ८ मे २०२५ रोजी विद्यालयाच्या प्रांगणात केले होते.

 

विशेष म्हणजे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या रयत शिक्षण संस्थेचा कारभार पाहतात. त्यामुळे राजकीय गोटात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!