
माझ्या नादाला लागला तर तुमच्या xxxमध्ये नांगराचा फाळ घालीन
गोरक्षकांना महायुतीच्या आमदाराची धमकी, गोरक्षक आक्रमक, महायुतीतच दुफळी, व्हिडिओ व्हायरल
सांगोला – रयत क्रांती संघटनेचे नेते, सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांवर सडकून टीका केली आहे. गोरक्षक हेच मोठे दलाल आहेत. तुम्हाला कामे धंदे आहेत की नाही? तुम्ही दहा वीस गाई पाळा, शेण काढा, व्यवसाय करा, बोक्यांनो… शेतकऱ्यांच्या जीवावर कुठे जगत आहात, असा संताप सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने खळबळ उडाली आहे.
सांगोल्यामध्ये जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्याला पाठवण्यास विरोध करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात सदाभाऊ खोत यांचे नेतृत्वाखाली सांगोल्यात मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर त्यांना येत असलेल्या धमक्यांना सदाभाऊ खोत यांनी थेट गावरान भाषेत उत्तर दिले. शेतकऱ्याने कधीही खिलार किंवा देशी गाई बाजारामध्ये विकायला आणलेली नाही. हा हजारो वर्षांचा अतिहास आहे. मी तुम्हाला विचारतो कधी आपण देशी गाई बाजारात घेऊन आलो का? कधी खिलार गाय बाजारात आणली का? खिलार किंवा देशी गाईची कधीच विक्री होत नाही. लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला चालू केल्या मी शेतकऱ्यांची बाजू घ्यायला लागलो, मला धमक्या यायला सुरू झाल्या. अरे धमक्या कोणाला देता, शेतकऱ्यांच्या पोराला म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय, तुम्ही जर माझ्या वाटेला गेला. तर तुमच्या xxx नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा,असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. राज्यात गायी, जर्शी, होस्टन, अशा दुधाळ जाती अशी एक कोटी १५ लाख, म्हैशीची संख्या ४४ लाख, शेळ्या ९० लाख, मेंढींची संख्या २८ ला असे एकूण दोन कोटी ८५ लाख पशुधन आहे. राज्यात दररोज अडीच कोटी लिटर दूध तयार होते. हे सर्व शेतकरी काबाड कष्टाने जगवितो. त्यामुळे गोशाळेचा दर्जा शेतकऱ्यांच्या गोठ्यालाच दिला पाहिजे असे मत माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. दरम्यान खोत यांच्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गावोगावी शेतकऱ्यांची ‘गोपालक सेना’ उभी राहणार आहे. जनावरांच्या विक्रीत कोणीही अडथळा आणल्यास शेतकरी रस्त्यावर उतरेल,’ असा इशाराही आमदार सदखभाऊ खोत यांनी दिला. त्याचबरोबर कायदा हातात घेणाऱ्या तथाकथित गोरक्षकांवर कडक कारवाई व्हावी, अशी आग्रही मागणी खोत यांनी केली आहे.