
मुंबई विशेष प्रतिनिधी – उद्या विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीची चर्चा राज्यात सुरू आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होणार आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे, या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला.
महाविकास आघाडीच्या आमदारांना निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे. उद्याच्या निवडणुकीत सर्व उमेदवार निवडून येतील हा आमचा प्रयत्न आहे. मित्र पक्षांना काय मदत करता येईल हे आम्ही पाहत आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.