Latest Marathi News
Ganesh J GIF

ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेत्रीचे कर्करोगाने अकाली निधन

कर्करोगाशी झुंज हरली!, कलाविश्वात शोककळा, वयाच्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई – मराठी कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचे वयाच्या ३८व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्रीची कर्करोगाशी झुंज सुरु होती. अखेर या आजाराशी सुरु असलेल्या लढाईत तिला अपयश आले. अचानक निधनाच्या समोर आलेल्या बातमीने साऱ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

प्रिया मराठे यांनी अनेक मालिकेतील आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. सर्वाधिक गाजलेली हिंदी मालिका पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांनी काम केलं होतं. ‘तुझेचं गीत मी गात आहे’ या मालिकेत प्रिया मराठे यांनी काम केलं होतं. ‘पवित्र रिश्ता’, ‘या सुखांनो या’, ‘बडे अच्छे लगते हैं’, आणि ‘तू भेटशी नव्याने’ यांसारख्या मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. सध्या त्या ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत रागिणी अग्निहोत्री ही खलनायकी भूमिका साकारत होत्या. त्यांच्या निधनाबाबत अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रिया मराठेचा जन्म २३ एप्रिल १९८७ रोजी ठाण्यात झाला होता. २००६ मध्ये ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने ‘विघ्नहर्ता महागणपती’ आणि ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ (२०१६) या मराठी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. २४ एप्रिल २०१२ रोजी अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी लग्न केले होते. प्रिया मराठे हिचा पती शंतनु मोघे याने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर जोडपं म्हणूनही यांच्याकडे पाहिलं जात होतं. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये प्रिया मराठे घराघरात पोहोचली होती. प्रेक्षकांच्या मनात तिने अढळ स्थान निर्माण केलं होतं. भूमिका नकारात्मक असली तरी त्यातूनही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

प्रिया शेवटची ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. परंतु ही मालिकासुद्धा तिने मधेच सोडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!