
आता हद्द झाली! धावत्या बाईकवर कपलचा रोडवरच रोमान्स
कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, नियमांची ऐशीतैशी, नेटकरी संतप्त, पोलिसांची कारवाई
लखनऊ – अलीकडे फेमस होण्यासाठी काहीजण कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असतात. त्यातच काहीजण समाजाची पर्वा न बाळगता रस्त्यावर अश्लील चाळे करतात, यात तरुण पिढी सगळ्यात पुढे आहे, सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
उत्तरप्रदेशच्या गोरखपुरमधून आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये कपल धावत्या बाईकवर रोमान्स करत आहे. प्रेयसी बाईकच्या पेट्रोलच्या टाकीवर प्रियकराला मिठी मारुन बसली आहे. शिवाय हेलम्टही घाललेले नाही. दोघेही वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. रस्त्यावार वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु आहे. मात्र या कपलला याचे कोणतेही भान नव्हते. यामुळे ते स्वतःबरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालत होते. चुकूनही बाईक चालवताना तरुणाचा तोल गेला, किंवा अचानक मोठ्या गाडीला धडकले तर यामुळे गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता होती. पण याचे त्यांना कोणतेही सोयरेसुतक नव्हते. असं म्हणतात की, प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं. पण काही लोक या म्हणीला फारच गांभीर्यानं घेतात आणि मर्यादांचं उल्लंघन करतात. असाच काहीसा प्रकार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतो. सध्या बाईक रोमान्सचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक लोकांना संताप व्यक्त केला आहे. लोकांकडून यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
हा व्हिडीओ पाहून पोलिसांनी या कपलवर कारवाई केली असून त्यांना आर्थिक दंड ठोठावला आहे. पण कारवाईवर नेटकरी फारसे समाधानी नाहीत. त्यांची बाईक जप्त करा किंवा त्यांना दोन-चार दिवस जेलमध्ये टाका, अशी मागणी केली जात आहे.