
रीलचा नाद जडला म्हणून पतीने पत्नीचा काटा काढला
रीलमुळे झाली संसाराची राखरांगोळी, या कारणामुळे पतीने केली पत्नीची हत्या, असा होता कट?
भिवंडी – भिवंडी शहरातील ईदगाह झोपडपट्टीजवळील खाडी परिसरात एका महिलेचे धडावेगळे शीर आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती. या घटनेची तातडीने चौकशी सुरू करण्यात आली आणि भोईवाडा पोलीस पथकाने अवघ्या ४८ तासांत आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.
परवीन उर्फ मुस्कान असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पती मोहम्मद तहा इम्तियाज अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. मुमोहम्मद तहा आणि मुस्कान यांनी दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांना एक वर्षाचा मुलगा, मोहम्मद अजलान आहे. मुस्कान ही इन्स्टाग्रामवर रील बनवत होती. तिला रीलचा नाद लागला होता. आणि ती काही मुलांशी संपर्कात देखील होती. ज्यामुळे मोहम्मद तहाशी तिचे वाद वाढले होते. घटनेच्या दिवशी म्हणजे २८ ऑगस्ट रोजी घराबाहेर पडताच, रील बनवण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा वाद झाला. पोलिसांच्या तपासानुसार, २९ ऑगस्ट रोजी मोहम्मद तहाने क्रूरपणे मुस्कानची हत्या केली. त्यानंतर त्याने शरीराचे दोन तुकडे केले आणि खाडीत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अजूनही धड आढळलेला नाही; पोलिस ड्रोन आणि बोटींच्या साहाय्याने शोध घेत आहेत.दरम्यान, मोहम्मद तहाला भिवंडी न्यायालयात हजर केले असता, त्याला ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हत्येत वापरलेले हत्यार शोधण्याचे काम सुरू आहे.
आरोपी आणि त्याची बायको एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत होते आणि आपल्या मुलांना मारहाण करायचे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे भिवंडीत खळबळ उडाली आहे.