
माजी उपमुख्यमंत्र्याची बायको जर्सी गाय सारखी आहे
माजी आमदाराचे वादग्रस्त विधान, बायको ज्या पक्षाची आमदार त्याच पक्षावर टीका, राजकीय वातावरण तापले, भाजप वादात?
पटना – बिहार विधानसभा निवडणुका अगदी जवळ आल्या असून महागठबंधन आणि एनडीए आघाडीत चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण आता राजकीय नेते वादग्रस्त विधाने करत आहेत. मध्यंतरी नरेंद्र मोदी यांच्या आईला दिलेल्या शिव्यांमुळे राजकीय वातावरण तापले होते. आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान आले आहे.
भाजपशी जवळीक असलेले माजी आमदार राजबल्लभ यादव यांनी जनता दलाचे नेते माजी मंत्री तेजस्वी यादव यांच्या पत्नीबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘तेजस्वी यादव मते मिळवण्यासाठी जातीबद्दल बोलतात. पण त्यांनी दुसऱ्याच्या जातीत लग्न केले.’ जर तेजस्वीने यादव मुलीशी लग्न केले असते तर यादव समुदायातील मुलीला त्याचा फायदा झाला असता. हरियाणा-पंजाबमधून आणण्याची काय गरज होती, त्यांनी तिकडून जर्सी गाय आणली आहे. राजबल्लभ यादव नारदीगंज येथील सभेला संबोधित करत होते. राजबल्लभ यांनी तेजस्वी यादव यांच्या पत्नी राजश्री यांचे नाव घेतले नसले तरी ते तेजस्वी यादव आणि त्यांच्या पत्नी राजश्री यांच्यावर टिप्पणी करत होते. दरम्यान, राजवल्लभ यांच्या पत्नी विभा देवी यांना राजदने तिकीट दिले होते आणि २०२० मध्ये त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. तथापि, विभा यांना पक्षातून काढून टाकण्यात आलेले नाही. परंतु गेल्या महिन्यात विभा देवी गया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंचावर उपस्थित होत्या.
माजी मंत्री स्वतः बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात होते. संपूर्ण बिहारला त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल माहिती आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते बेताल आणि अश्लील विधाने करत आहेत. राजदमधून काढून टाकल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द संपली आहे, असे सडेतोड प्रत्युत्तर राजदच्या नेत्यांकडून देण्यात आले आहे.