Latest Marathi News
Ganesh J GIF

ठाकरेंचे दोन आमदार सोडले तर सर्वच आमदार शिवसेनेत प्रवेश करणार

दसऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, वेळही ठरली, ते दोन आमदार कोण?या मुळे पक्ष फुटणार?

मुंबई – शिवसेना आणि दसरा मेळावा यांचे एक वेगळे आणि भावनिक नाते आहे. पण याच दसरा मेळाव्यानंतर शिवसेना पुन्हा एकदा फुटणार असल्याचा दावा आमदाराने केला आहे, त्यामुळे राजकिय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी दोन आमदार सोडले तर उर्वरीत सर्व आमदार आणि मुंबई महापालिकेतील जवळपास ८० टक्के उरलेले सर्व माजी नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी तयार आहेत, यामुळे दसरा मेळावा झाल्यानंतर आम्ही ठाकरेंना दणका देणार आहोत, असा मोठा दावा कृपाल तुमाणे यांनी केला आहे. अनेक आमदार संजय राऊत यांच्या भूमिकेवर नाराज आहेत, असा दावा देखील कृपाल तुमाने यांनी केलाय. दसरा हा शिवसेनेसाठी महत्त्वाचा दिवस असतो आणि याच दिवशी अनेकदा पक्षाच्या मोठ्या घोषणा झाल्या आहेत. यावेळीही दसऱ्यानंतर मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे संकेत देखील कृपाल तुमाने यांनी दिले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यात धमाका करण्याची घोषणा केली होती. यावर शिवसेना शिंदे गटाने हे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) आधीच आव्हानात्मक परिस्थितीत आहे, आणि अशा वेळी आणखी आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यास हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो. सध्या महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कृपाल तुमाने यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपमध्ये विलीन व्हायला निघाला आहे ते दुसऱ्यांचे आमदार विलीन करण्याची भाषा करत आहेत. आज शिवसेनेत जे आमदार, खासदार आहेत ते शुद्ध, निष्ठावंत असे आहेत. ज्यांना जायचं होतं तो गाळ निघून गेलेला आहे, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!