
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचे अपघाती निधन?
अपघाताची बातमी सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांमध्ये उडाला गोंधळ, स्टोरी व्हायरल पण....
मुंबई – साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या काजल अग्रवालचे निधन झाले अशी बातमी सोशल मीडियावर आली, त्यानंतर एकच खळबळ उडाली. काही ठिकाणी काजलचा अपघातात मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. पण तो दावा खोटा ठरला आहे.
सोमवारी रात्री सोशल मीडियावर बातमी व्हायरल झालेली की काजल अग्रवालचा अपघातात मृत्यू झाला. काजल अग्रवाल एका गंभीर अपघातात जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला असा दावा करण्यात आला होता. ही बातमी इतक्या वेगाने पसरली की #KajalAggarwal ट्रेंडिंगला सुरुवात झाली आणि तिचे चाहते खूप चिंतेत आले. काजलने लगेचच या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. काजलने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, ‘मला काही बातम्या मिळाल्या ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की मी अपघाताची शिकार झाले आणि आता जिवंत नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर हे अगदी हास्यास्पद आहे कारण ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. ईश्वराच्या कृपेने मी पूर्णपणे ठीक आहे. सुरक्षित आहे आणि चांगल्या अवस्थेत आहे. मी विनंती करते की अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे शेअरही करू नका. आपण सकारात्मकतेवर आणि सत्यावर लक्ष केंद्रित करूया’ असं तिने म्हटलं आहे. या पोस्टमुळे चाहत्यांचा विश्वास बसला की काजल सुरक्षित आहे आणि तिच्या निधनाच्या बातम्या केवळ अफवा आहेत. दरम्यान अलिकडेच काजल अग्रवाल तिच्या कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसली. तिने मालदीव ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
काजलबद्दल बोलायचं झालं तर तिने २००४ मध्ये ‘क्यो! हो गया ना’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचं तामिळ आणि तेलुगु सिनेमामध्ये मोठं नाव आहे. दरम्यान आता काजल द इंडियन स्टोरी, इंडियन ३ आणि रामायणम् या चित्रपटात पहायला मिळणार आहे.