
ब्रेकिंग! सी पी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती
राधाकृष्णन यांचा बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर विजय, इंडिया आघाडीला पराभवाचा धक्का, एवढ्या मतांनी केला पराभव
दिल्ली – जगदीप धनखड यांनी अधिवेशनकाळातच अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदासाठी आज उपराष्ट्रपदासाठी मतदान झाले. भाजप समर्थित एनडीएचे उमेदवार सी.पी , राधाकृष्णन यांची देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे.
एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना ४५२ तर इंडीया आघाडीच्या उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. महत्त्वाचे म्हणजे, १३ खासदारांनी मतदान केलेच नसल्याचे समोर आले आहे. उपराष्ट्रपतीपदाकरिता एनडीएकडून सी. पी. राधाकृष्णन तर इंडीया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, पावसाळी संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आरोग्याच्या कारणास्तव जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपतीपद रिक्त झाले होते. लोकसभा व राज्यसभेचे मिळून ७८८ खासदार असतात. यापैकी ७ जागा रिक्त असून १३ खासदारांनी मतदान केलेले नाही. एकूण ७८१ मतदान होणे अपेक्षित होते. परंतु, १३ मते पडलेली नसल्याने आता ७८६ मतांची मोजणी केली जाणार आहे. मतदान न करणाऱ्यांमध्ये बीआरएसचे ०४, बीजेडीचे ०७, अकाली दलाचे ०१ आणि अपक्ष ०१ अशा खासदारांचा समावेश आहे. आज सकाळी १० वाजता मतदान सुरू झाले आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदान केले. दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली असतानाच भाजपने रणनीतीत बदल तब्बल १९ संसदीय समितीच्या बैठका बोलावून विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीवर सरशी केली होती.
सी. पी. राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूच्या तिरुप्पुर जिल्ह्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन आहे. ते तामिळनाडूतील प्रभावशाली कोंगु वेल्लार गाउंडर समुदायाचे आहेत, ज्याचा राजकीय प्रभाव मोठा मानला जातो. सध्या महाराष्ट्र या राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली होती.