
दोन पुरुष आणि एका महिलेला खांबाला बांधून बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, अनैतिक संबंधाचा गावकऱ्यांचा आरोप पण पोलीस तपासात वेगळेच सत्य समोर....
भुवनेश्वर – ओडिशा राज्यात मागील काही दिवसांपासून खून आणि मारहाणीच्या घटनात वाढ झाली आहे. आता ओडिसतील मयुरभंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गावात दोन पुरुष आणि एका महिलेला खांबाला बांधून मारहाण केल्याचा घटना समोर आली आहे.
ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील काशीपुरा गावात मारहाणीचा घटना घडली आहे. यावेळी गावकऱ्यांनी काठ्या आणि हत्यारे घेऊन अमानुष मारहाण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील आहे. ही महिला येथील काशीपूर गावातील रहिवासी आहे. तिचे लग्न झाले आहे आणि तिला दोन मुले आहेत. ही महिला दोन पुरूषांसह जशीपूरच्या आठवडी बाजारात गेली होती. जेव्हा हे लोक परत येत होते तेव्हा महिलेच्या कुटुंबीयांनी त्यांना पाहिले आणि तिथेच त्या महिलेशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी दोन पुरुषांपैकी एका पुरुषासोबत महिलेचे अनैतिक सबंध असल्याचा आरोप करत तिघांनाही विजेच्या खांबाला बांधले. आणि बेदम मारहाण केली. व्हिडीओत दिसत आहे की, तिघांना विजेच्या खांबाला बांधून लाथाबुक्क्या आणि काठीने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
पोलिसात तपासात दोन पुरुषांपैकी एकजण महिलेचा माहेरचा नातेवाईक असून तो त्या महिलेचा भाऊ लागतो, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्या पुरूष आणि महिले दोघांनाही रुग्णालयात नेले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.