Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात पुन्हा गोळीबार! कोथरूडमध्ये कुख्यात गँगचा गोळीबार

क्षुल्लक कारणावरून बेछूट गोळीबार, एकजण गंभीर जखमी, पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर, नेमके कारण काय?

पुणे – पुणे शहरातील कोथरूडमध्ये गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मध्यरात्री एका व्यक्तीवर गोळीबार झाला आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी केलेल्या या गोळीबारात प्रकाश धुमाळ हे गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गोळीबारामुळे पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

ही घटना कोथरुड पोलिस स्टेशनपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर घडली. निलेश घायवळ गॅंगमधील पाच जणांनी मध्यारात्री कोथरुडमध्ये गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार मुसा शेख, रोहीत आखाडे,गणेश राऊत मयुर कुंभारे आणि अन्य एका आरोपीने प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केल्याची माहिती समोर आले आहे. धुमाळ यांच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे. त्यांच्यावरती सह्याद्री रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. गाडीला जाण्यासाठी वाट दिली नाही म्हणून हा गोळीबार करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश धुमाळ हा रात्री मित्रांसोबत उभा होता. त्यावेळी दुचाकीला साईड न दिल्यामुळे या घायवळच्या टोळीतील लोकांसोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर टोळीतील मयुर कुंभारे, मुसा शेख, रोहीत आखाड आणि गणेश राऊत यांनी गोळीबार केला. मयुर कुंभारेने तीन गोळ्या झाडल्या. यात प्रकाश धुमाळच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली. गोळ्या लागल्यानंतर प्रकाश तशाच अवस्थेत आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता. त्या ठिकाणी रक्ताचे आणि पायाचे ठसे दिसून येत आहेत. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. धुमाळ याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तो आपल्या मित्रांसोबत बोलत उभा होता रस्ता दिला नाही. इतक्या शुल्लक करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोथरूड भागात गजानन उर्फ गज्या मारणे आणि निलेश घायवळ टोळीची दहशत आहे. या दोन टोळ्यांमध्ये वैमनस्य आहे. याआधीही या ठिकाणी अश्या घटना घडल्या होत्या, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे जिथे ही घटना घडली ते ठिकाण पोलिस स्टेशनपासून २०० मीटर अंतरावर आहे. हा गोळीबार निलेश घायवळ टोळीतील गुंडांकडून करण्यात आला आहे. या टोळीतील मयुर कुंभारे याने हा गोळीबार केला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याचे इतर साथीदार फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!