
प्रियकराच्या ‘त्या’ ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या
सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती उघड, एक्स-लिव्ह इन पार्टनरला अटक, नोटमध्ये काय माहिती?
सुरत – गुजरातच्या सूरत येथील सारोली परिसरात एका इमारतीत ४ महिन्यांपूर्वी मॉडल सुखप्रीत कौर हिनं आत्महत्या केली होती. आता या प्रकरणात सूरत पोलिसांनी सुखप्रीतच्या लिव्ह इन पार्टनरला अटक केली आहे. ब्लॅकमेलिंगमुले तिने आत्महत्या केली होती. आता लिव्ह इन पार्टनरला अटक करण्यात आली आहे.
सुखप्रीत कौर असे हत्या करण्यात आलेल्या मॉडेलचे नाव आहे. लिव्ह इन पार्टनर महेंद्र राजपूत असे हत्या करणाऱ्याचे नाव आहे. सुखप्रीत कौर मूळची मध्य प्रदेशातील शिवपुरीची रहिवासी होती. ती एक वर्षापूर्वी मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी सुरतमध्ये आली होती. सुरुवातीला ती महेंद्र राजपूत नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये दिंडौली भागात राहत होती. ब्रेकअप झाल्यानंतर ती मैत्रिणींसोबत कुंभारिया येथील सारथी रेसिडेन्सीमध्ये राहायला गेली. सुखप्रीत सुरतमध्ये साडीच्या जाहिरातींचे शूटिंग करत असे. मात्र, ब्रेकअप झाल्यानंतरही एक्स बॉयफ्रेंडकडून छळ सुरूच होता. एक्स बॉयफ्रेंड तिला वारंवार खासगी फोटोंवरून ब्लॅकमेल करीत होता. तसेच तिला मारहाण करत शारीरिक छळ देखिल करत होता. या छळाला कंटाळून सुखप्रीतने दोन मे रोजी तिच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती. यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली होती, त्याचे सुखप्रीतने “महेंद्रने ब्रेकअप झाल्यानंतर तिला शारीरिक इजा करण्याची आणि तिचे खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती,” असा आरोप केला होता. या पत्राच्या आधारे पोलिसांनी महेंद्र राजपूतविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
सारोली पोलिसांनी महेंद्र राजपूत याच्याविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यावर तो आपले घर बंद करून फरार झाला होता आणि गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता, पण अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.