Latest Marathi News
Ganesh J GIF

वादग्रस्त अभिनेत्री रामलीला नाटकात साकारणार मंदोदरीची भूमिका

संत आणि हिंदू संघटनेचा तीव्र विरोध, कार्यक्रम न होऊ देण्याचा इशारा, अशिष्ट स्त्री उल्लेख करत जोरदार टीका, मात्र...

दिल्ली – दिल्लीच्या लाल किल्ला मैदानावर होणाऱ्या लव-कुश रामलीलामध्ये अभिनेत्री पूनम पांडे ही रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारणार आहे, परंतु पूनम पांडेला इंद्रप्रस्थ विश्व हिंदू परिषदेने विरोध केला असून तिने हे पात्र साकारण्यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या वादात सापडला आहे.

दिल्लीतील सर्वात जुन्या रामलीला समितीने पूनम पांडेला या भूमिकेसाठी आमंत्रित केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषदेने पूनम पांडेला विरोध केला असून या निर्णयामुळे सांस्कृतिक आणि धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे म्हटले आहे. विश्व हिंदू परिषदेने रामलीला समितीला त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. इंद्रप्रस्थ विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली राज्य सचिव सुरेंद्र गुप्ता यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “रामलीलाचे सादरीकरण भारतीय संस्कृती आणि परंपरा प्रतिबिंबित करते. त्यात ग्लॅमरचा समावेश करणे परंपरा आणि शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे.” सुरेंद्र गुप्ता यांनी लवकुश रामलीला समितीला पत्र लिहून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे पूनम पांडेच्या निवडीमुळे साधु-संतांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले- “रामलीला समितींना आमची विनंती आहे की, त्यांनी सभ्यता राखावी. रामलीलाची प्रतिष्ठा कलंकित होऊ नये म्हणून कलाकारांची पार्श्वभूमी आणि वर्तन विचारात घेतले पाहिजे. चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून विचारपूर्वक पावले उचलणे महत्त्वाचे आहे, अशी विनंती केली आहे. संतांनी पूनम पांडेविषयी ‘अशिष्ट महिला’ असा शब्दप्रयोग करत, लवकुश रामलीला समितीला तात्काळ तिला बाहेर काढण्याची मागणी केली. अन्यथा समितीला संतांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, समितीच्या वतीने सांगण्यात आले की, भूतकाळात डाकूही संसदेत पोहोचले. तसेच, रामलीलेच्या मंचावर कोणीही आले तर आपण त्याला शुभेच्छा देतो. मंदोदरीची भूमिका सामर्थ्यवान आहे. त्यामुळे पूनम पांडे ती भूमिका करताना तिची भावना बदलून धर्मनिष्ठ नारी म्हणून ती भूमिका साकारेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.

लवकुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुनकुमार यांनी सांगितले की, दरवर्षी नव्या कलाकारांना संधी दिली जाते. यंदा भगवान परशुरामाची भूमिका खासदार मनोज तिवारी साकारणार आहेत, तर केवटाची भूमिका गायक शंकर साहनी करतील. रावणाची ताकदीची भूमिका आर्य बब्बर साकारणार आहेत. पूनम पांडे मंदोदरीची भूमिका करणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!