
मोठी बातमी! माजी मंत्री धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार
धनंजय मुंडे यांना दुहेरी झटका?, या कारणामुळे धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत?, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मीक कराड कनेक्शन उघड झाल्याने कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांची आमदारकी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच नेते, माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा केला आहे. मुंडे यांची आमदारकी पुढील चार महिन्यांत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच धनंजय मुंडे यांना आपल्या घरावर दावा केल्याचा आरोपही करुणा मुंडे यांनी केला आहे. मात्र करुणा मुंडे याच्या या खळबळजनक दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी माझ्या या घरावर हक्क सांगितला होता. त्यांनी हे घर माझं असून घराचा १५ लाखांचं मेंटेनन्स रखडलेलं आहे. आता मला ते घर विकायचं असून माझं कर्ज फेडायचं असल्याचे म्हटलं होते. पुढे त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडे हे घरावर हक्क सांगते असले तर ते घर त्यांचे नाही माझ्या सासऱ्यांचे आहे आणि त्यावर माझाही आणि माझ्या मुलांचा हक्क आहे, पण धनंजय मुंडे खालच्या पातळीवर जाऊन कृत्य करत आहे. त्यांनी हवं तर सरकारी बंगला सोडावा आणि माझ्या घरात येऊन राहावे कारण ते घर त्याचंही आहे, असेही पुढील चार महिन्यांत त्यांची आमदारकीही जाणार आहे,” असा थेट दावाच त्यांनी केला आहे. पंकजा मुंडेंप्रमाणेच धनंजय मुंडेंचं देखील रस्सी जल गयी, लेकीन बल नही गया असं आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे बीडमध्ये जाती -जातीत तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही यावेळी करुणा शर्मा यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. यावर योग्य वेळी मुंडेंना संधी देऊ असं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिले आहे. त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.