
उत्तर प्रदेश दि १९ (प्रतिनिधी)- जर तुम्ही भाजीखरेदीसाठी जाणार असाल तर सावधान कारण सध्या एक व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका भाजी विक्रेत्याने अत्यंत किळसवाणे आणि घृणास्पद काम केले आहे. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
बरेलीच्या इज्जतनगर भागातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. दुर्गेश गुप्ता नामक एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे. शरीफ खान असे या वयोवृद्ध भाजी विक्रेत्याचे नाव आहे. व्हिडीओत भाजी विक्रेता ग्राहकांना विकण्यासाठी त्याच्या गाडीवर ठेवलेल्या भाज्यांवर थुंकताना आणि चक्क लघवी करताना कॅमेरात पकडला गेला आहे. विशेष म्हणजे खान मागील ३० ते ३५ वर्षापासून भाजी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे. भाजप कार्यकर्त्या प्रीती गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रेम नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण अटक करण्यापूर्वी त्या व्यक्तीला स्थानिकांनी मारहाण केली असल्याची माहिती आहे.
After spitting on fruits & rotis, latest is urinating on vegetables!
Sharif Khan has been selling vegetables in Bareilly since 35 years. A video of him urinating on vegetables on his cart has now gone viral.
Now @zoo_bear will clarify that those vegetables will bring 'barkat'!! pic.twitter.com/Sb21MLvQpY
— Priti Gandhi – प्रीति गांधी (@MrsGandhi) September 17, 2022
यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारे भाजी विक्रेते सांडपाण्याजवळ भाजीची लागवड करताना तसेच भाजी ताजी दिसण्यासाठी त्यावर घाणेरडे पाणी फवारताना दिसले आहेत. पण आता तर थेट लघवी केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नेटकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.