दुसरीही मुलगीच झाल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय
इस्लामपुरमधील 'त्या' धक्कादायक घटनेने सगळेच हादरले
सांगली दि १९ (प्रतिनिधी)- मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी होत असल्याची चर्चा सुरु असतानाच ती नकुशी होत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.कारण दुसरीही मुलगीच झाल्याने चिडून विवाहितेला तिच्या निर्दयी पतीनेच विहिरीत ढकलून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरजवळील कापूसखेड हद्दीत घडली आहे.

राजनंदिनी सरनोबत असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत याला पोलीसांनी अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राजनंदिनीला याआधी एक सात वर्षाची मुलगी आहे. चार महिन्यांपूर्वी राजनंदिनीला मुलगीच झाली होती.दुस-यावेळेसही मुलगीच झाल्याने तिचा पती राजनंदीनीवर नाराज होता.हाच राग मनात धरून त्याने पत्नी राजनंदिनीला कापूसखेड रोडला पहाटे मोटरसायकलवरून पहाटे फिरायला घेवून गेला होता. आणि नंतर संधी साधत राजनंदिनीला विहिरीत ढकलून देत खून केला. पतीने सुरुवातीला पत्नी ही मॉर्निंग वॉकच्या वेळेस लघवीला गेली असता पाय घसरुन विहिरीत पडल्याचे सांगितले. मात्र, मुलीचे आई वडील व भाऊ यांच्या तक्रारीनंतर पोलीसांनी चाैकशी केली असता त्याने विहिरीत ढकलून दिल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
मुलींचे हजार पुरुषांमागे प्रमाण ९३३ वरुन ९०६ वरती आले आहे. त्यामुळे हवीशी परत नकोशी झाल्याचे चित्र आहे. त्यातच पुन्हा मुलगीच झाल्याने निर्दयी पतीने पत्नीला विहिरीत ढकलत तिचा खून केला आहे. पोलीसांनी पतीला अटक केली आहे. पण दोन्ही मुली आईच्या प्रेमाला कायमच्या मुकल्या आहेत.