
माझ्याशी बोलणाऱ्या मुलीशी तू का बोलतो म्हणत यशाचा चाकूने भोसकून खून
यशच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, वाढदिवसाच्या पार्टीत रक्ताचा सडा, हत्येचे कारण काय?
बीड – बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात यश ढाका या तरुणाची क्षुल्लक कारणावरून दि. 25 सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री आठ वाजता हत्या करण्यात आली होती. माने कॉम्प्लेक्स भागात गजबजलेल्या ठिकाणी लोकांसमोर सहा ते आठ जणांनी यश ढाका याच्या पोटात चाकू खुपसून हत्या करण्यात आली होती. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यश देवेंद्र ढाका हा बीड शहरातील पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांचा मुलगा होता. रात्रीच्या वेळी झालेल्या बाचाबाचीत आरोपींना चाकूने यशच्या छातीत सपासप वार केले, त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता. यश ढाका याचा खून करण्यात आलेला एक आरोपी सूरज काटे हा स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला होता. इतर आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. याचदरम्यान, यश ढाका याची हत्या करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. वर्दळ असलेल्या ठिकाणी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करत यशची हत्या करण्यात आली होती. वाढदिवसाच्या पार्टीत हल्लेखोर आणि यश यांच्यात वाद झाला होता. त्या वादातून भरचौकात यशची हत्या करण्यात आली होती. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती आहे. गेल्या महिन्यात यश आणि सूरज यांच्यात वाद झाला होता. मित्राचा वाढदिवस साजरा करायला गेले असताना हा वाद झाल्याची माहिती आहे. यामुळे त्या दोघांत कटुता आली असल्याचे बोलले जात आहे. हाच वाद मिटविण्यासाठी यशने सूरजला भेटायला बोलावलं होतं. मात्र, तिथे या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि सूरजने थेट यशच्या छातीत वार केले. ज्यामध्ये यशचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान गणेश शिराळे, निखील घोडके व कृष्णा सोनवणे यांनी तु माझ्याशी बोलणाऱ्या मुलीशी का बोलतो? या कारणावरुन कट करुन खून केलेला आहे. असा जवाब आकाश कंडेरे या यशच्या मामेभावाने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकिय वळण मिळाले आहे.
ढाका यांच्या तक्रारीनुसार बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एकूण पाच आरोपींवर ३०२ अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला असून एक आरोपी तत्काळ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मात्र, यातील आणखी चार आरोपी अद्यापही फरार आहेत.