
पुण्यात भररस्त्यात तरुणाची तरूणीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, लोकांची बघ्याची भूमिका, कोणत्या कारणामुळे मारहाण, काय घडले?
पुणे – पुणे शहरात रात्रीच्या सुमारास एक युवक एका युवतीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विझहेश म्हणजे आजूबाजूला अनेक लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती.
पुणे-सातारा रस्त्यावरील के के मार्केट ते चव्हाण नगर मार्गावर मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंत या घटनेची कोणतीही औपचारिक तक्रार सहकारनगर पोलीस ठाण्यात नोंदवली गेली नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. व्हिडिओत दिसत आहे की, मारहाण झाल्यानंतर तो तरुण बाईकवर बसून कोणाला तरी फोन करत होता. तर दुसरीकडे, मारहाण झालेली तरुणीही काही अंतरावर उभा राहून फोन करत असल्याचे दिसते. तरुण आधी तरुणीच्या कानशिलात मारल्यानंतर तिचा हात खेचण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर ही तरुणी रिक्षात बसून निघणार होती, मात्र त्या तरुणाने रिक्षाजवळ जाऊन तिला काहीतरी बोलले. तरुणी रिक्षा सोडून खाली उतरली आणि त्या तरुणाकडे चालत गेली. यावेळी त्या तरुणाने उडी मारून तिच्या कंबरेखाली लाथ मारली, मात्र थोड्या मागे सरकल्यामुळे तिला गंभीर इजा झाली नाही. या घटनेला पाहणाऱ्या लोकांची मोठी गर्दी असूनही, कोणीही पुढे येऊन मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. आता ही मारहाण कुठल्या कारणामुळे झाली, मारहाण करणारा तरुण संबंधित तरुणीचा कोण आहे? याबद्दल कुठली ही माहिती मिळू शकलेली नाही. पण यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी सांगितले की, रात्री उशिरापर्यंत या घटनेची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तरीही, पुण्यातील नागरिक या घटनेमुळे संतप्त झाले आहेत आणि या प्रकारावर उपाययोजना होणे आवश्यक असल्याची मागणी करत आहेत.