Latest Marathi News
Ganesh J GIF

तिने आधार दिला म्हणत मग माझ्या मांडीवर रात्री का रडत होतात?

धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांचा जोरदार हल्लाबोल, पंकजा मुंडे यांच्यवर साधला निशाणा, नेमकं काय म्हणाल्या?

बीड – भाजप नेत्या, मंत्री पंकजा मुंडे यांचा भगवान गडावर दसरा मेळावा झाला, मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी कठीण काळात आपल्याला पंकजाताईंनी कसा आधार दिला, यावर भाष्य केले. पण आता करुणा शर्मा यांनी मोठा गौप्यस्फोट करत मुंडे बंधू आणि भगिनींची पोलखोल करत धक्कादायक दावे केले आहेत.

धनंजय मुंडे यांनी कालच्या दसरा मेळाव्यात मागील काळात आलेल्या अडचणींचा उल्लेख करताना गेले २५० दिवस माझी वाईट मानसिकता झाली होती. माझी बहीण माझ्या जवळ येऊन तास न् तास बसत होती. ज्या काळात मीडिया ट्रायल सुरू होतं, त्यावेळी माझ्या बहिणीने आधार दिला. माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांनी आधार दिला, असं विधान धनंजय मुंडे यांनी केले होते. त्यांनी केलेल्या विधानानंतर आता करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, ज्या बहिणीला आज आधार मानतात, ती किती त्रास देत होती. तुम्ही माझ्या मांडीवर रात्री दोन-दोन, तीन वाजेपर्यंत रडत होता, पण आज तिचा आधार वाटतो का? तुम्ही म्हणताय की शेतकरी लोकांना पंकजाताई न्याय देतील, कशाप्रकारे न्याय देतील? गोरगरीब लोकांचे पैसे न देता हे दोघे कारखाने तुम्ही बंद केले. आज भी ऊसतोड कामगारांचे पैसे ३०-३०, ४०-४० कोटी दोघा कारखान्यांमध्ये अडकलेले आहेत पण तुम्ही देत नाही, असा गंंभीर आरोप करुणा शर्मा मुंडे यांनी केला आहे. दरम्यान काल झालेल्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकवण्यात आले. हे संकेत आहे की काय पण असू द्या, आमच्या पोटाचं पाणी वाल्मिक कराडशिवाय हालत नाही, ना हलणार, त्यासाठी परळीत त्यांना कोणी नवीन व्यक्ती नकोयं, जे गुंडाराज संपवतील, ही भीती असल्यामुळे दोघे बहिणभाऊ एकत्र आले असल्याचा दावा करुणा यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी करुणा मुंडेंनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही हल्लाबोल केला होता. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे बीडमध्ये जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंकजा मुंडेंप्रमाणेच धनंजय मुंडेंचं देखील रस्सी जल गयी, लेकीन बल नही गया असंच आहे, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली होती.

माझ्यासारखा कोणी नवीन जर राजकारणात आला तर तो गुंडागर्दी संपवेल, राजकारण आहे ते संपवतील. त्याच्यासाठी तुम्ही दोघे भाई-बहीण एकत्र आलेले आहे. कोणत्याही जनतेची सेवा, शेतकऱ्यांची सेवेसाठी तुम्ही एकत्र आलेले नाही, असाही गंभीर आरोप करुणा मुंडेंनी केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!