
राष्ट्रगीत गायल्यामुळे ही लोकप्रिय गायिका अडकली वादात
गायिकेने गायलेल्या राष्ट्रगीताचे होतेय कौतुक, पण या कारणामुळे गायिका जोरदार ट्रोल, नेमकं काय घडलं?
गुवाहाटी – भारतात महिलांच्या विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली आहे. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत गायिका श्रेया घोषाल यांनी राष्ट्रगीत गायलं. तिच्या आवाजातील राष्ट्रगीत सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. अनेक जण हे राष्ट्रगीत अभिमानाने शेअर करत आहेत. पण आता एक नवीनच वाद सुरू झाला आहे.
भारतात राष्ट्रगीत गाण्याचे काही नियम आहेत. राष्ट्रगीत हे ४८ ते ५२ सेकंदात संपले पाहिजे असा नियम आहे. पण श्रेयाने गायलेले राष्ट्रगीत हे १ मिनिट आणि ७ सेकंद सुरू होते. यावर भाविका कपूर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. भाविका कपूर यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, भारताच्या राष्ट्रगीतासाठी कडक नियम आहेत. ‘राष्ट्रगीत 52 सेकंदाच्या आत संपलं पाहीजे. गायनाची क्षमता दाखवण्यासाठी त्याचा वेग कमी करण्याचा कोणताही प्रयत्न अयोग्य आणि स्थापित मार्गदर्शक तत्त्वांच्या विरुद्ध आहे. वेग कमी करणे आणि वाढवणे हे प्रोटोकॉलचे उल्लंघन मानले जाते. आणि ते अनादर मानले जाऊ शकते. क्रीडा स्पर्धांसारख्या काही विशिष्ट प्रसंगी अंदाजे २ सेकंदाची संक्षिप्त आवृत्ती गाण्याची परवानगी आहे. पण राष्ट्रगीताच्या गतीमध्ये बदल करण्यास सक्त मनाई आहे. ही बाब गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे. देशभरांत म्ह्टले जाणारे राष्ट्रगीत हे पाच कडव्यांपैकी फक्त पहिले कडवे आहे. राष्ट्रगीत गाताना किंवा ऐकताना सावधान स्थितीतच उभे राहून राष्ट्राला वंदन करुनच हे गीत म्हणावे. राष्ट्रगीत हे नेहमी समूहाने कुठल्याही वाद्याशिवाय ५२ सेकंदात म्हणायचे असते. काही वेळेस हे गीत संक्षिप्त रूपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे. राष्ट्रगीत गाताना त्याचा अपमान व निंदनीय प्रकारचे कृत्य करणे कायदयान्वये गुन्हा आहे.
https://x.com/BhavikaKapoor5/status/1973239922363605140?
भारत देशाचे देशाचे राष्ट्रगीत “जन-गण-मन” हे नोबेल पारितोषिक विजेता रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेमध्ये लिहिले आहे. २७ डिसेंबर १९११ रोजी राष्ट्रीय कोंग्रेसच्या कलकत्ता येथील अधिवेशनामध्ये राष्ट्रगीत सर्वप्रथम गायले गेले. ह्या गीताला २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.