
दहशत निर्माण करण्यासाठी मित्राची केली गोळी झाडून हत्या
हत्या करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, आरोपी फरार, मित्राला विहिरीजवळ घेऊन गेली आणि....
मेरठ – मुस्कनच्या निळ्या ड्रममुळे चर्चेत आलेले मेरठ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी एका तरुणाने आपल्याच मित्रावर गोळीबार करत हत्या केली. या हत्याकांडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. तसेच मोठी खळबळ उडाली आहे.
मेरठ मधील लिसाडी रोड परिसरात एका तरुणाने त्याच्या मित्राची छातीत तीन गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरुणाच्या मित्रांनी हत्येचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यात एक मित्र त्याच्यावर गोळ्या झाडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण खाली पडलेल्या तरुणावर गोळ्या झाडताना दिसत आहे. एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटावे अशा पद्धतीने आरोपींनी हा व्हिडीओ शूट केला आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आदिल आहे. आदिल मेरठमधील लिसाडी गेट ठाणे परिसरात राहतो. तो कपडे विकण्याचा व्यवसाय करायचा. एका विहिरीजवळ नेऊन त्याची हत्या करण्यात आली. एका तरुणाने पिस्तूलातून गोळ्या झाडल्या, तर दुसरा तरुण त्याच वेळी मोबाईलवर संपूर्ण घटना शूट करत होता. व्हिडिओ बनवणाऱ्या साथीदाराच्या इशाऱ्यावर हातात पिस्तूल असलेल्या आरोपीने जमिनीवर पडलेल्या आदिलवर सलग तीन गोळ्या झाडल्या. आदिलची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून फरार झाले. मोटारसायकलवरून जातानाचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.
आदिलच्या कुटुंबाने लोहिया नगर पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तथापि, आदिलला बेशुद्ध करून गोळी मारण्यात आली होती की भीती पसरवण्यासाठी त्याला मारल्यानंतर गोळी मारण्यात आली. पोलीस हत्येमागील कारण तपासत आहेत.