
रामदास कदमांच्या बायकोने स्वत:ला जाळून घेतलं की कोणी तिला जाळलं होत?
रामदास कदम यांच्या त्या आरोपाला अनिल परबांचे प्रत्युत्तर, बोटांच्या ठशाबाबत खुलासा करत धक्कादायक खुलासा, म्हणाले
मुंबई – शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले. या आरोपांनंतर आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यासह त्यांचे पूत्र आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना प्रत्युत्तर दिले आहे.
बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवला? याचा तपास करावा असे रामदास कदम यांनी म्हटले होते. त्यावर आता अनिल परब यांनी वक्तव्य करत शवागर आणि शवपेटीशिवाय दोन दिवस मृतदेह ठेवता येतो का? असा सवाल केला आहे. बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी मी २४ तास तिथे होतो. त्यामुळे सगळ्या घटनांचा मी साक्षीदार आहे. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला जी घटना घडली ती पाहिली आहे. रामदास कदम यांना बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर जवळपास १५ वर्षांनी कंठ फुटला आहे. २०१४ ला रामदास कदम मंत्री झाले. त्यांना मंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर मग त्यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? २०१९ ला मुलाला आमदारकी घेतली. उद्धव ठाकरेंकडून सगळं मिळत होतं तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते. जर ते स्वतःला स्वाभिमानी समजतात तर रामदास कदम यांनी तेव्हाच पक्ष सोडायला हवा होता, असे म्हणत १९९३ मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. ते जाळून घेतलं की जाळलं? हे देखील नार्को टेस्टमध्ये आलं पाहिजे. कुणाला बंगले बांधून दिले, त्याचे तपशीलही आले पाहिजेत. योगेश कदम हा आता गृहराज्यमंत्री आहे. आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. बाळासाहेब ठाकरेंचं मृत्यूपत्र काय आहे ते मला माहीत आहे. त्यातला तपशील मला ठाऊक आहे. ते करुन घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. शिवाय त्यावर कुणाच्या सह्या आहेत, कुणाचे ठसे आहेत हे मला माहीत आहे. मेलेल्या माणसाच्या हाताचे ठसे घेतले तरीही काही उपयोग होत नाही. हे मी तुम्हाला सांगतो आहे. रामदास कदम यांचं ज्ञान कच्चंं आहे, असा टोला कदम यांना परब यांना लगावला आहे.
रामदास कदम यांच्यावर डान्सबार, वाळू चोरी, जमिनी बळकावणे, दादागिरी, घरातील आत्महत्यांचे प्रश्न उभे करून परब यांनी हिवाळी अधिवेशनात पुराव्यासकट आवाज उठवण्याचा इशारा दिला. “मी कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. त्यांनी माफी मागितली नाही तर कोर्टात जावं लागेल,” असेही अनिल परब म्हणाले आहेत.