
बिहारमध्ये हा नेता होणार मुख्यमंत्री, इतक्या लोकांची पसंती
सी व्होटरने वाढवली भाजपची डोकेदुखी, या नेत्यामुळे नितीश कुमार यांची लोकप्रियता घटली?,पहा कोणाला किती पसंती
पटणा – बिहार निवडणुकीची घोषणा झाल्यापासून निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी तीव्र केली आहे. भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सहकार्याने एक मजबूत रणनीती विकसित करत आहे. दरम्यान, तेजस्वी यादव युतीसोबत काम करत आहेत. पण आता एक चकित करणारा सर्व्हे समोर आला आहे. त्यामुळे अनेकांना जोरदार धक्का बसला आहे.
सी-व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी बिहार निवडणुकीविषयी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. मुख्यमंत्री पदासाठी तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदासाठी पहिले पसंती आहेत. या वर्षी फेब्रुवारीपासून झालेल्या सर्वेक्षणात तेजस्वी यवाद हे अव्वल स्थानावर आहेत, जरी या काळात काही टक्केवारी चढ-उतार झाली आहे. प्रशांत किशोर सध्या तेजस्वीनंतर दुसऱ्या स्थानावर आहेत. तेजस्वी यादव यांना फेब्रुवारीमध्ये त्यांना ४१ टक्के, जूनमध्ये ३५ टक्के आणि ऑगस्टमध्ये ३१ टक्के लोकांनी पसंती दिली होती, तर सप्टेंबरमध्ये त्यांना ३६ टक्के लोकांनी पसंती दिली होती. प्रशांत किशोर यांची फेब्रुवारीमध्ये टक्केवारी खूपच कमी होती, परंतु सप्टेंबरपासून ती सातत्याने वाढत आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांना १५ टक्के, जूनमध्ये १६ टक्के, ऑगस्टमध्ये २२ टक्के आणि सप्टेंबरमध्ये २३ टक्के लोकांनी पसंती दिली होती. दुसरीकडे सप्टेंबरमध्ये नितीश कुमार यांना १६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. एनडीएचे सम्राट चौधरी यांची लोकप्रियता घसरून ६.५ टक्क्यांवर आली आहे. प्रशांत किशोर यांचा प्रचार एनडीएच्या मतदारांवर परिणाम करत असून त्याचा थेट फायदा तेजस्वी यादव यांना होत असल्याचं मत या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आलं आहे. सी वोटर ट्रॅकरनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ५७ टक्क्यांवरून घसरून ५१ टक्क्यांवर आली आहे. दुसरीकडे, राहुल गांधी यांची रेटिंग ३५ टक्क्यांवरून ४१ टक्क्यांवर गेली आहे. यामुळे दोघांमधील अंतर केवळ १० टक्के इतके राहिले आहे. ताज्या सप्टेंबरच्या सर्वेक्षणात ६१ टक्के लोक नितीश कुमार यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत, तर ३८ टक्के लोकांनी असंतुष्टता व्यक्त केली आहे. याचा अर्थ, मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्याबद्दल लोकांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात सकारात्मक मत आहे, पण त्यांची लोकप्रियता मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत मात्र कमी झाली आहे.
मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि पसंतीचे प्रमाण
तेजस्वी यादव (माजी उपमुख्यमंत्री) : ३६%
प्रशांत किशोर (PK) जन सूरजचे संस्थापक : २३%
नितीश कुमार (मुख्यमंत्री) : १६%
चिराग पासवान एलजेपी नेते : १०%
सम्राट चौधरी (उपमुख्यमंत्री) : ७%