
धाकट्या भावाची जास्त काळजी घेते म्हणून पत्नीचा काढला काटा’
संशयामुळे नऊ महिण्यापूर्वी सुरु झालेला संसाराचा धक्कादायक अंत
उत्तर प्रदेश दि १९ (प्रतिनिधी)- आपली पत्नी आपल्यापेक्षा लहान भावाचीच काळजी जास्त घेते या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना गाझियाबाद जिल्ह्यात घडली आहे. विशेष म्हणजे दोघांना नऊ महिन्यांपूर्वीच मोठ्या उत्साहात विवाह झाला होता. पण संशयामुळे तो अर्ध्यावेच मोडला आहे.
गाझियाबाद जिल्ह्यातील मसुरी पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसलगढी येथील गौरवचा विवाह ९ महिन्यांपूर्वी खोडा येथील टीना सोबत झाला होता. दुसऱ्या मजल्यावर तो पत्नीसह राहत होता. तळमजल्यावर त्याचे दोन भाऊ आणि आई-वडील राहत होते.टीनाला गौरव व्यसनी असल्याचे लग्नानंतर समजले. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होता. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये वाद झाला. गाैरवने नशेत बेसबॉलच्या बॅटने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली.आणि टीना बेशुद्ध पडल्यावर तिचा गळा दाबून खून केला आणि घरातून पळ काढला. पोलीसांनी गाैरवला ताब्यात घेऊन चाैकशी केल्यानंतर त्याने सांगितले की, त्याचे लग्न ९ महिन्यांपूर्वी टीनाशी झाले होते. माझ्यापेक्षा ती धाकट्या भावाची ती खूप काळजी घेत होती. यामुळे टीनाचे आपल्यावर प्रेम नाही असे त्याला वाटत होते. टीनापासून वेगळे व्हायचे होते. त्यामुळे आपण तिचा खून केल्याची कबुली गाैरवने दिली आहे.
टीनाला गाैरव मारहाण करत असताना ती ओरडत होती, पण घरातील कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. पोलीसांनी टीनाच्या हत्येमध्ये वापरलेली बेसबॉल बॅट आणि ओढणी जप्त केली आहे. याबाबत पुढील तपास पोलिस करत आहेत.