
मुंबई दि १९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात पार पडलेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने वर्चस्व मिळवले आहे. ४९५ पैकी १४४ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. राष्ट्रवादीकडे १२६ , शिंदे गटाला ४१ , ठाकरे गटाला ३७ तर काँग्रेसला ६२ जागा मिळाल्या आहेत. अपक्षांनी ८८ जागांवर आघाडी घेतली आहे.
सरपंच जनतेतून निवडला जाईल असा ठराव पास केल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकी बाबत उत्सुकता होती. कोल्हापूर, ऒैरंगाबाद, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून आले आहे. तर जळगावात शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले भाजपाचा मात्र सुपडा साफ झाला आहे. धुळ्यात भाजपाचे वर्चस्व दिसून आले.यवतमाळ आणि साता-यात भाजपाने बाजी मारली आहे. पिचडांच्या गावात मात्र सत्ता भाजपाची आली असली तरी सरपंच मात्र राष्ट्रवादीचा निवडून आला आहे. पाहुयात सविस्तर निकाल
*नाशिक*
एकूण जागा – ८८
राष्ट्रवादी काँग्रेस -४१
शिवसेना- १३
भाजप -०५
काँगेस -०४
-माकप- ०८
शिदेगट -०१
इतर – १६
*पुणे*
एकूण जागा- ६१
राष्ट्रवादी काँग्रेस – ३०
भाजप – ३
शिवसेना – २
शिंदे गट – ३
काँग्रेस – ००
स्थानिक आघाडी – २३
*यवतमाळ*
एकूण जागा- ७२
शिवसेना – ०३
शिंदे गट – ००
भाजप- २०
राष्ट्रवादी- ०९
काँग्रेस- ३३
मनसे – ०१
स्थानिक -०६
*जळगाव*
एकूण जागा- १३
शिवसेना – ०३
शिंदे गट – ०३
भाजप- ००
राष्ट्रवादी- ०३
काँग्रेस- ००
अपक्ष -०४
*धुळे*
एकुण ग्रामपंचायत- ३३
शिवसेना – ००
शिंदे गट – ००
भाजप- ३२
राष्ट्रवादी- ०१
काँग्रेस- ००
*अहमदनगर*
एकुण ग्रामपंचायती- ४५
शिवसेना – ००
भाजप- १६
राष्ट्रवादी- २०
काँग्रेस- ००
स्थानिक आघाडी-०९
*नंदूरबार*
एकूण जागा- ७५
भाजपा- ४२
शिंदेगट- २८
राष्ट्रवादी- ०१
अपक्ष- ०४