
म्हणून पोलिसांनी चक्क ट्रकवर केली दगडफेक
धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, व्हायरल व्हिडीओनंतर तीन पोलीस निलंबित, नेमके काय घडले?
सोनभद्र – पोलीस आपल्या सुरक्षेसाठी असतात. पण हेच पोलिस कधी कधी चुकीचा मार्ग वापरतात. त्यामुळे पोलिसांवर टीकेची झोड उठते. असाच काहीसा प्रकार सोंभद्रामधून समोर आला आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी चक्क एका ट्रकवर दगडफेक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
सोनभद्र जिल्ह्यातील रॉबर्ट्सगंज परिसरात पोलिसांनी अवैध खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांवर टीकेची झोड उठली असून, याप्रकरणी तीन शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. लोधी टोल प्लाझाजवळ खनिज विभागाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तपासणी सुरू होती. यावेळी काही ट्रक चालकांनी बॅरिकेड्स तोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांनी दगडफेक केल्याने ट्रकच्या केबिनचे नुकसान झाले. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने ‘लोग क्या कहेंगे’ या इन्स्टाग्राम हँडलवरून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोनभद्रचे पोलीस उपअधीक्षक त्रिभुवन नाथ त्रिपाठी यांनी सांगितले की, पोलिसांनी बेकायदेशीर मार्ग अवलंबल्याने कारवाई करण्यात आली आहे. खनिज विभागाचे निरीक्षक योगेश शुक्ला यांनी दावा केला की, ट्रक चालकांनी त्यांच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी दगडफेक केली. व्हिडीओत पोलीस “थांबवा, थांबवा” असे ओरडताना दिसत आहेत. याप्रकरणी ट्रक चालकांविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. व्हायरल व्हिडीओवर या व्हिडीओखाली अनेकांनी पोलिसांविरोधात कमेंट केली आहे. तर काही जणांनी घटनेची सत्यता सांगितली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस आम्ही करत आहोत. यातून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी जी दगडफेक केली ती रॉबर्ट्सगंज परिसरातील लोधी टोल प्लाझाजवळ झाली. पोलिसांनी दगडफेकीत ट्रकच्या केबिनचे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.