
ती माझ्या जेवणात रक्त मिसळायची आणि जादूटोणा करायची*
अभिनेत्याचे महिला खासदार यांच्यावर गंभीर आरोप, धक्कादायक आरोप करत केली पोलखोल, महिला खासदार कायम वादात?
मुंबई – चित्रपट सृष्टीत आतापर्यंत ‘मी टू’ आणि ‘कास्टिंग काऊच’ यामुळे महिला कलाकारांबरोबर नेहमी सापत्न वागणूक देत असल्याचे समोर आले होते. पण आता एका अभिनेत्याने एका महिला खासदारावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याने खासदार अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २००८ मध्ये अध्ययन सुमन आणि कंगना राणौत यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली होती. पण आता सुमन याने धक्कादायक आरोप केले होते. दोघांची ओळख २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राज – द मिस्ट्री कंटिन्यू’ सिनेमात झाली. ओळखीची रुपांतर कालांतराने मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. पण २००९ साली दोघे वेगळे झाले. मुलाखतीत अध्यायन म्हणालेला, कंगनाने त्याला चप्पल आणि सँडलने मारहाणही केली. “कंगना मला मारहाण करायची आणि सर्वांसमोर माझा अपमान करायची. ती माझ्या जेवणात रक्त मिसळायची आणि माझ्यावर जादूटोणाही करायची. ज्या दिवशी मी कंगना राणौतशी ब्रेकअप केलं, त्या दिवशी ती खूप रागावली होती. तिने तिची सँडल काढली आणि माझ्यावर फेकली. तिने माझा फोन भिंतीवर आपटून तो फोडला. ती माझ्यावर ओरडत होती. कंगना प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. सुमन यांच्यानंतर सुरज पंंचोली, ऋतिक रोशन, अजय देवगण यांसारख्या सेलिब्रिटींसोबत कंगना यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी एकेकाळी जोर धरला होता. दरम्यान कंगना रनौतला अनेक वर्षांनंतर चाहत्यांनी रँपवर वॉक करताना पाहिले. त्यांनी नवीन ज्वेलरी कलेक्शन ‘सल्तनत’ साठी रँप वॉक केले. कंगना रॉयल लूकमध्ये फार आकर्षक दिसत होती.
कंगना रनौत केवळ अभिनेत्रीच नाहीत, तर खासदार असून अभिनय क्षेत्रातही सक्रिय आहेत. ती हॉलिवूड फिल्म ‘ब्लेस्ड बी द एविल’ मध्ये दिसणार आहे. शिवाय, त्यांनी गेल्या वर्षी ‘इमरजेंसी’ नावाची फिल्म डायरेक्ट केली होती, ज्यात त्यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती.