
महाराष्ट्रातील या आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवत केली पैशाची मागणी
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, थेट फडणवीसांच्या आमदारालाच गळाला लावण्याचा डाव, मैत्री केली आणि मग....
कोल्हापूर – अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपच्या माध्यमातून अडकवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या बहीण भावास अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी कोल्हापुरातील चंदगडमध्ये जाऊन ही अटक केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
हनी ट्रॅप प्रकरणी आमदार शिवाजी पाटील यांनी ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. शिवाजी पाटील हे कोल्हापुरातील चंदगड विधानसभेचे अपक्ष आमदार आहेत. तसेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये हनी ट्रॅपची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी जलदगतीने पावले उचलून चंदगडमधून एका भावा-बहिणीस अटक केली आहे. आमदार शिवाजी पाटील यांना वर्षभरापासून अश्लील संदेश, छायाचित्र आणि व्हिडिओ पाठवून त्रास दिला जात होता. या संदर्भात आमदार पाटील यांनी ८ ऑक्टोबरला ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. यानंतर कोल्हापूर आणि ठाणे पोलिसांनी अन्वेषण करून चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावातील बहीण-भावाला अटक केली आहे. मोहन पवार आणि शामल पवार अशी त्यांची नावे आहेत. आमदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार या बहीण-भावाने प्रारंभी आमदारांसोबत मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली आणि भ्रमणभाषवर ‘चॅटिंग’ चालू केले. यानंतर त्यांची राजकीय प्रतिमा मलिन करण्याची धमकी देत दोन-तीन वेळा १० लाख रुपयांची मागणी केली. आमदारांनी प्रारंभी हे त्रासदायक संदेश आणि क्रमांक ‘ब्लॉक’ केले, तरीही आरोपींनी नवीन क्रमांक वापरून आमदार राजेश पाटील यांना त्रास देणे चालूच ठेवले, त्यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली.
चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आर्थिक कमाईच्या हेतूने की आणखी काही कारणामुळे हनी ट्रॅपचा प्रयत्न करण्यात आला याचा तपास ठाणे पोलीस करत आहेत. पण यामुळे हनी ट्रॅप मुद्दा समोर आला आहे.