Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

या महिन्यात होणार परीक्षेला सुरुवात, जाणून घ्या नेमक्या तारखा आणि परीक्षेच्या तयारीला लागा, पहा संभाव्य वेळापत्रक

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे अनेकजण आता तयारीला देखील लागले आहेत.

राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता बारावी, दहावीची लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा घेण्यात येतात. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार इयत्ता बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते१८ मार्च २०२६ या दरम्यान होणार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान या ऑनलाईन परीक्षा देखील याच काळात होणार आहेत. तर २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या काळात इयत्ता दहावीची परीक्षा होणार आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहेत. तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा 2२फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होणार अस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने, तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेच्या प्रात्यक्षिक, लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरवर्षी लाखो विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसत असतात. या परीक्षांचे नियोजन काही महिन्यांआधीच करावे लागते. तांत्रिक बाबींची किंवा इतर कोणत्या गोष्टींची अडचण भासू नये यासाठी शिक्षण विभागाकडून काही महिने आगोदरच वेळापत्रक जाहीर करण्यात येत असते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!