
‘धनंजय मुंडे यांनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला’
धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप, पत्नी म्हणून मान्यता मिळवण्यासाठी न्यायालयात धाव, जरांगेच्या एन्ट्रीमुळे ट्वीस्ट
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर वारंवार गंभीर आरोप करणाऱ्या करूणा मुंडे यांनी पुन्हा एकदा धक्कादायक विधान केले आहे. यावेळी त्यांनी मुंडे यांनी आपल्या बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
करूणा मुंडे यांची बहीण रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर २०२१ मध्ये बलात्काराचा आरोप केला होता. १९९६ पासून ओळख असून, २००६ पासून वारंवार बलात्कार झाल्याचे रेणू शर्मा यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी पोलीस तक्रार दाखल केली होती, परंतु काही दिवसांतच ती तक्रार मागे घेण्यात आली होती. याविषयी बोलताना करूणा मुंडे म्हणाल्या की, “मी मनोज जरांगे पाटील यांना भेटून माझ्याकडील पुराव्यांविषयी माहिती दिली. यात माझ्या बहिणीवर झालेल्या बलात्काराचे, तसेच माझ्या आईच्या आत्महत्येची सुसाईड नोट आणि त्या संबंधित पुरावे आहेत.” धनंजय मुंडे यांनी गुंडांची टोळी पाळली होती आणि जर हे सर्व पुरावे बाहेर काढले तर धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रात राहणेही मुश्किल होईल, स्वतःच्या समाजाचे लोक त्यांना चपलेने मारतील, असे थेट आव्हान करूणा मुंडे यांनी दिले आहे. धनंजय मुंडे यांना माझे चॅलेंज आहे, मी अंगावर येते, मला शिंगावर घे. तुला जीआर (सरकारी निर्णय), शपथपत्र कळते का?” असा सवालही त्यांनी मुंडे यांना केला आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी आपल्याला समजावून सांगितल्याचे नमूद करत, त्यांनी ‘सर्व जातीतील लोकांना न्याय दिला’ असे म्हणत जरांगे यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, जरांगे पाटील यांचा या प्रकरणात अप्रत्यक्ष सहभाग आणि करूणा मुंडे यांचा आक्रमक पवित्रा यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाला जे शपथपत्र सादर केलं होतं या शपथपत्रात त्यांनी करुणा शर्मा-मुंडे यांचा पत्नी म्हणून उल्लेख केला नव्हता असा आरोप करत न्यायालायात धाव घेतली आहे.