Latest Marathi News
Ganesh J GIF

हा तर दुसरा ‘कॅप्टन खरात’ ; खेडच्या ‘गवळी बाबा’चा पर्दाफाश

पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका भोंदू बाबाचा खरा चेहरा आता चव्हाट्यावर आला आहे. शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी नावाच्या या भोंदूने महिलांच्या अगतिकतेचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीणमधील खेड तालुका सध्या एका भयंकर कृत्याने हादरला आहे. चांडोली येथील शिवदत्त आश्रमात ‘महाराज’ म्हणून मिरवणारा नवनाथ गवळी हा प्रत्यक्षात वासनांध भोंदू असल्याचे उघड झाले आहे. एका ३४ वर्षीय महिलेने या गवळीबाबा विरुद्ध धारिष्ट्य दाखवून खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

​मे २०२५ पासून पीडित महिला कुटुंबासह आश्रमात दर्शनासाठी जात होती. १७ जुलै २०२५ रोजी पहाटे जप करत असताना आरोपीने महिलेचा विनयभंग केला. तुझ्या अंगातील दोष दूर करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील,” अशी अश्लील मागणी आरोपीने केली. धक्कादायक बाब म्हणजे, सुरुवातीला केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असला, तरी प्रत्यक्षात आपल्यावर अत्याचार झाल्याची कबुली आता पीडितेने दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!