
‘द केरला स्टोरी’नंतर या सिनेमाचा सीक्वल ‘द केरला स्टोरी २ : गोज बियॉन्ड’ २७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला होता. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचं आमिष दाखवत बळजबरीने त्यांचं धर्मांतर होत असल्याचं लव्ह जिहादामागचं भयाण वास्तव या सिनेमातून मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आलं.

रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र तरीही प्रेक्षकांनी सिनेमाला प्रेम दिलं. आता थिएटर गाजवल्यानंतर ‘द केरला स्टोरी २’ ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.’द केरला स्टोरी २’ ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी प्रेक्षकांना आता फार वाट पाहावी लागणार नाही. कारण येत्या ८ मेला ‘द केरला स्टोरी २’ झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. सिनेमाच्या टीमकडून याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जर थिएटरमध्ये ‘द केरला स्टोरी २’ पाहायचा राहून गेला असेल तर आता प्रेक्षकांना हा सिनेमा कधीही घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे.

‘द केरला स्टोरी २’ सिनेमाचं दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंह यांनी केलं आहे. तर विपुल शाह यांची निर्मिती आहे. ‘द केरला स्टोरी २’मध्ये अदिती भाटिया, उल्का गुप्ता आणि ऐश्वर्या ओझा मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने भारतात ५२.९२ कोटी तर जगभरात ६२.३३ कोटींचा बिजनेस केला. ओटीटीवर हा सिनेमा हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


