
ब्रेकिंग: ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपचा ‘प्लॅन बी’ तयार? भाजप नेत्याच्या एका दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ; नेमकं काय घडणार?
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, भाजप नेते नवनाथ बन यांनी मोठा दावा करत खळबळ उडवली आहे. त्यांच्या मते, उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार असल्यास त्यांच्या पक्षातच मतभेद उफाळून येऊ शकतात.नवनाथ बन यांनी आरोप केला की, काही आमदार क्रॉस व्होटिंग करू शकतात आणि त्यामागे संजय राऊत यांच्या गटाची रणनीती असू शकते. त्यामुळे निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

बन यांनी पुढे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सहा वर्षांत त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा ठोस मुद्दा मांडला नाही. उपस्थितीही ५० टक्के पेक्षा कमी होती,” असा आरोप त्यांनी केला.संजय राऊतांवरही निशाणासंजय राऊत यांच्या संपादकीय भूमिकेवरही बन यांनी टीका केली. “मराठी भाषेचं मूलभूत ज्ञान नसलेला व्यक्ती संपादक कसा?” असा सवाल करत त्यांनी ‘सामना’च्या कार्यकारी संपादक पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

भाषेच्या नावाखाली गुंडगिरी नको.मराठी भाषेबाबत भूमिका स्पष्ट करताना बन म्हणाले की, महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकणं आवश्यक आहे, मात्र धमकावून किंवा हिंसाचार करून भाषा शिकवणं चुकीचं आहे. भाषा ही संवादाचं माध्यम आहे, संघर्षाचं नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या दाव्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले असून, आगामी विधान परिषद निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


