Latest Marathi News
Ganesh J GIF

सोशल मीडियावरील ‘मैत्री’ पडली महाग: अनाथ तरुणीच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन अत्याचार करणारा नराधम गजाआड.

सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेऊन नराधमाने अनाथ तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. मदतीचा बहाणा करून आधी तरुणीला भेटायला बोलावले. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी काही तासातच नराधमाला अटक केली. क्रिश भोईर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.डोंबिवलीत राहणारी पीडित तरुणी एका खासगी ठिकाणी नोकरी करते. काही दिवसांपूर्वी एका खोट्या प्रकरणावरून तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत मैत्रिणीच्या वडिलांचाही समावेश होता. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायची होती.

मात्र तिच्यासोबत कोणी नसल्याने तिने सोशल मीडियावर ओळख झालेल्या मित्र क्रिश भोईर याच्याकडे मदत मागितली. क्रिशने पीडित तरुणीला पोलीस स्टेशनला नेण्याचे आश्वासन दिले. मात्र विश्वासघात करत त्याने तिला मानपाडा पोलीस ठाण्यात न नेता एका निर्जनस्थळी नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता त्याने तरुणीच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर केले आणि मोबाईल घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. घाबरलेल्या पीडितेने हिंमत दाखवत मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस पथकाने तपासाची चक्रे फिरवून नराधमाला बेड्या ठोकल्या.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!