Latest Marathi News
Ganesh J GIF

बारावी बोर्डाचा निकाल उद्या; यंदा कोण बाजी मारणार? विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी (दि.२) दुपारी एक वाजता ऑनलाइन प्रसिद्ध हाेणार आहे.राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी गुरुवारी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

दरम्यान, सीबीएसई बाेर्ड दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, बारावीच्या निकालाची प्रतीक्षा कायम आहे. आयसीईएसई बाेर्डाचा दहावी, बारावी निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार, याची उत्सुकता हाेती. राज्य बाेर्डानेही गुरुवारी रात्री परिपत्रक काढत निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात पुणे येथे राज्य मंडळ कार्यालयात सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे, असेही परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. यात विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक, अशा सर्व शाखांचे निकाल एकाच वेळी जाहीर होणार आहेत.

मागील वर्षी विज्ञान शाखेचा निकाल ९७.३५ टक्के, वाणिज्य ९२.६८, कला ८०.५३ आणि व्यावसायिक शाखेचा निकाल ८३.३ टक्के लागला होता. यंदा काेणत्या विद्याशाखेचा निकाल किती टक्के आणि विभागनिहाय काेण बाजी मारणार?, मुले हुशार की मुली? हे देखील शनिवारी स्पष्ट हाेणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!