Latest Marathi News
Ganesh J GIF

पोलीस ढिले पडल्यामुळेच गुन्हेगार माजले? मंत्री संजय शिरसाट यांचा थेट गृहविभागावर निशाणा

छत्रपती संभाजीनगरमधून नाशिक पोलिसांनी नाशिक धर्मांतर प्रकरणी निदा खान) या मुख्य आरोपीला अटक केली आहे. हि मार्चमध्ये घटना घडली होती.दीड दोन महिने ती कुठे होती? कुणाला माहीत नाही. निदा खान ही एकटी नाही, तर तिची आई, मावशी देखीलयातसहभागी होती. एमआयएम पक्षाने तिला सहकार्य केलंय. याआधी इम्तियाज जलील यांनी या संदर्भात वक्तव्य करत एकाअर्थी पाठिंबाच दिला होता. इतरही ठिकाणी एमआयएम त्यांच्या अशाच हालचाली वाढवत आहेत. हे सगळे प्रकार एमआयएमच्या नेतृत्वात होतात. निदा खान एक मोहरा असल्याचेसांगत सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी नाशिकमधील बहुचर्चित TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी भाष्यकेलंआहे. राज्यभरात महिलांवरहोणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत बोलतानाही संजय सिरसाटयांनी पोलिसांच्या कारवाई संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात पोलिसांमध्ये आक्रमकपणा नाही. पोलीस प्रशासनाने गांभीर्याने कारवाई करावी. पोलिसांचा धाक हा गुंडांवर असावा,असेही ते म्हणाले.

हे एक मोठ षडयंत्र, इम्तियाज जलील यांचीहीचौकशीझाली पाहजे.
राज्यात हिंदूचा द्वेष करण्याचे प्रकार सुरू आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगरसह सगळीकडे असे प्रकार पाहायला मिळतील. मी मुख्यमंत्र्यांना भेटून एसआयटी चौकशीची मागणी करणार आहे. TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण? याचा शोध लागला पाहिजे. 22-30च्या दरम्यानच्या तरुणांना अस प्रशिक्षण देणं, नोकरी नाही तरी त्यांच्याकडे पैसा आहे. बाईक आहेत, पैसा येतो कुठून? बलात्कार, नशेखोरीचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. याप्रकरणी इम्तियाज जलील यांची देखील चौकशी झाली पाहिजे. हे एक मोठ षडयंत्र आहे असेही संजय शिरसाट म्हणाले.

युतीअसल्याने दोघांनी सोबत येऊन काम करणं अपेक्षित आहे.
मुंबई महापालिकेला चांगलं करण्याच्या, लोकांच्या अडचणी दूर करण्याचं काम आम्ही करतोय. नालेसफाई संदर्भात दोघांनी सोबत येऊन काम करणं अपेक्षित आहे. एकमेकांमध्ये समन्वय कायम ठेवावा. वेगवेगळे दौरे केल्याने लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. युतीत एकत्र भेट द्यावी. मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, ते याची दखल घेतील. चांगलं काम करायला कोणी सोबत येत असेल तर त्यांना देखील सोबत घ्यायला पाहिजे, असेही संजय सिरसाट म्हणाले. मुंबईतील महायुतीती लखडाजंगी बाबततेबोलत होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!