Latest Marathi News
Ganesh J GIF

निदा खानच्या प्रेग्नन्सी टेस्टचा रिपोर्ट समोर; कायदेशीर प्रक्रियेनंतर मोठी अपडेट

नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस धर्मांतर, लैंगिक शोषण आणि मानसिक छळ प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान हिच्या 40 दिवसांच्या लपाछपीनंतर ती अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी राबवलेल्या एका अत्यंत गुप्त आणि वेगवान मोहिमेत निदा खानला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. तिने अटकपूर्व जामिनासाठी आधीच हालचाली करत अर्ज देखील केला होता. मात्र, कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला. याच दरम्यान ती गरोदर असल्याची माहिती समोर आली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. निदा खान फरार होती. याच दरम्यान ती गरोदर असल्याची माहिती समोर आली होती. त्यासाठी तिने मुंब्रामधील डॉक्टरांशी उपचाराबाबत मदत घेतल्याचे समोर आले होते. आता ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आली आहे.

निदा खानची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटीव्ह
यामध्ये निदा खान 2 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची (युरिन प्रेग्नंसी टेस्ट) केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. टेस्टमध्ये निदा खान गरोदर असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती आहे. थोड्याच वेळात निदा खानला करणार न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तर TCS प्रकरणातील संशयित महिला आरोपी निदा खानचे आई वडील आणि मावशीही नाशिक पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. निदा खान सोबत तिचे आई वडील आणि मावशी देखील राहत असल्याने त्यांची चौकशी केल्याची सुरू असल्याची माहिती आहे. निदा खानला आज नाशिक रोड कोर्टात हजर केले जाणार आहे, निदा खानला मदत करणाऱ्यांची देखील SIT कडून चौकशी सुरू आहे, निदा खानला मदत करणारा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलवर देखील निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

निदा खानने लपण्यासाठी खास लोकेशन निवडलं
निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कौसर कॉलनी निवडली होती. हे लोकेशन इतकं खास होतं की, ज्या इमारतीत ती लपली होती, तिच्या आजूबाजूला लांबलांबपर्यंत एकही घर नव्हतं. वर्दळ नसलेला आणि निर्जन भाग असल्याने कोणाला संशय येण्याची शक्यताच नव्हती. निदाला वाटले होते की या एकाकी भागात ती पोलिसांच्या नजरेतून सुरक्षित राहील, मात्र पोलिसांनी तिचा हा भ्रम तोडला.

दोन दिवस पोलिसांचा ‘वॉच’ अन् छापा!
निदा खान आपल्या कुटुंबासह (आई, वडील, भाऊ आणि आत्या) नारेगावच्या एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास होती. नाशिक एसआयटीला तांत्रिक तपासाद्वारे ती संभाजीनगरमध्ये असल्याची खात्री पटली होती. पोलिसांनी सलग दोन दिवस त्या इमारतीवर लांबून नजर ठेवली. जेव्हा ती फ्लॅटमध्येच असल्याची खात्री पटली, तेव्हा नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री छापा टाकून तिला बेड्या ठोकल्या.

जामीन फेटाळला अन् ‘गेम’ उलटला
निदा खानने स्वतःला गरोदर असल्याचे सांगत आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, नाशिक जिल्हा न्यायालयाने हे प्रकरण केवळ वैयक्तिक वाद नसून एका ‘आंतरराष्ट्रीय सिंडिकेट’चा भाग असल्याचे निरीक्षण नोंदवत तिचा जामीन वारंवार फेटाळला. जामीन फेटाळल्याच्या तीनच दिवसांत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. आता निदा खानच्या अटकेनंतर नाशिक धर्मांतर प्रकरणात आणखी काय धक्कादायक माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

धर्मांतरण प्रकरणात दोन आरोपी आज पुन्हा न्यायालयात
नाशिकमधील TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांना पुढील गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई नाका पोलिसांकडून दोघांची चौकशी सुरू असून, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही दोघांवर आहे. तसेच फिर्यादीला दिलेल्या गुंगीकारक पदार्थाचा स्रोत, बँक व्यवहार आणि फंडिंग याबाबतही पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!