Latest Marathi News
Ganesh J GIF

“बार्शीचा ‘मुन्नाभाई’ गजाआड! २० वर्षांपासून सुरू होता बोगस उपचारांचा गोरखधंदा.”

बार्शी तालुक्यात वैद्यकीय पदवी नसतानाही गेली तब्बल २० वर्षे दवाखाना चालवत रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आरोग्य विभागाने छापा टाकून क्लिनिक सील केल्यानंतर आरोपी फरार झाला होता.

मात्र, तो स्वतःच्या घरातच लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.रोग्य विभागाच्या धडक कारवाईनंतर आरोपी शंकर मनोहर पाठक हा पसार झाला होता. बार्शी तालुका पोलीस त्याचा शोध घेत असताना तो उपळाई ठोंगे येथील राहत्या घरात लपल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे, धनाजी केकान आणि पोलीस नाईक नागनाथ आंधळे यांच्या पथकाने उपळाई ठोंगे येथे छापा टाकला. घराची झडती घेतल्यानंतर आरोपी तेथेच आढळून आला. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल धनाजी केकान करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!