पुणे दि २४(प्रतिनिधी) – पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांना NIA या केंद्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ पुण्यात काल PFI संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले.विशेष म्हणजे यावेळी काही आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. यावरून आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.पोलीसांनी मात्र तशा घोषणा झाल्याचा इन्कार केला आहे.
पीएफआय संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना एनआयए आणि ईडीने छापा टाकत अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पीएफआय संघटनेच्या समर्थकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घोषणाबाजीबद्दल पोलिसांनी कोणताही दुजोरा दिला नाही. पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. पण घोषणाबाजीबद्दल मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
केंद्रीय तपास यंत्रणांने देशभरात पीएफआय संघटनेच्या कार्यालयावर छापे टाकत कारवाई केली होती. यावेळी काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याने संघटनेचे कारकर्ते आक्रमक झाले होते. देशविरोधी कारवाई करण्याचा कट रचण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पण या घोषणाबाजीच्या व्हिडिओमुळे पोलीस काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.