Latest Marathi News
Ganesh J GIF

याशिवाय पोस्टातून दहा हजारांच्या वर रक्कम काढता येणार नाही

पोस्टात आता एका दिवसात करता येणार इतक्या रूपयांचा व्यवहार

पुणे दि २४(प्रतिनिधी)- आधुनिक काळात बँकेचा व्यवहार आपल्या हातात आला आहे. तरीही आजही बरेच जण आपला पैसा गुंतवण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी पोस्टालाच प्राधान्य देतात.पोस्टानेही आपल्या व्यवस्थेत आधुनिकता स्वीकारत अनेक बदल केले आहेत. पण पोस्टाने घेतलेल्या एका निर्णयामुळे पोस्टाच्या ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे.पण पोस्टाने हा निर्णय का घेतला याचे कारणही दिले आहे.

टपाल खात्याने नुकतेच पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे.तो म्हणजे दहा हजार किंवा त्याहून अधिक रक्कम पडताळणी केल्याशिवाय काढता येणार नाही.पण ही पडताळणी सरसकट होणार नसून संबंधित पोस्ट आॅफीसमध्येच केली जाणार आहे.  १७ जुलै २०१८ च्या आदेशानुसार केवळ संबंधित शाखा पोस्ट ऑफिसमध्ये पैसे काढण्याची पडताळणी करण्यासाठी सूचित केले आहे. मंडळ प्रमुख स्थानिक परिस्थितीनुसार त्यांना करू इच्छित असलेले कोणतेही विशेष तपास करण्यास मोकळे आहेत.” बँकिंग फसवणूक होण्याची शक्यता कमी करणे हा या पडताळणीचा उद्देश आहे.असे दळणवळण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. बँकिंग प्रकिया अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय टपाल विभागाने आपल्या ग्राहकांसाठी पैसे काढण्याची मर्यादाही वाढवली आहे. खातेदार ग्रामीण डाक सेवेच्या शाखेतून एका दिवसात २०,००० रुपये काढू शकतात. यापूर्वी ही मर्यादा ५,००० रुपये होती.तसेच एका दिवसात खात्यात ५०,००० रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!