Latest Marathi News
Ganesh J GIF

७ नराधमांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचे टोकाचे पाऊल, २० गोळ्या खाल्ल्याने प्रकृती चिंताजनक

इचलकरंजीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पीडित मुलीवर सात जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप आहे. सात जणांनी अत्याचार केल्यानंतर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी आरोपींच्या कुटुंबियांचा दबाव असल्याने पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला.पीडितेवर वेगवेगळ्या ठिकाणी सात जणांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र आरोपीचे नातेवाईक पीडित मुलीवर दबाव टाकत असल्याने पीडित मुलगी मानसिक तणावात होती सततच्या मानसिक छळाला कंटाळून पीडित मुलीने आज सकाळी २० गोळ्या खाल्ल्या. पीडित मुलीवर इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

आरोपीच्या नातेवाईकांकडून पीडित मुलीवर सातत्याने दबाव टाकला जात होता. पीडित मुलगी भीतीच्या छायेमध्ये सध्या जगत होती. असला छळ मला सहन होत नाही, असे अनेकदा ती आम्हाला बोलून दाखवत होती, असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला.पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करून सातही जणांना अटक केली होती. मात्र आरोपी गुन्ह्यातून सुटावेत, यासाठी आरोपीच्या नातेवाईकांकडून पीडितेवर दबाव टाकला जात होता. व्हिडीओ दाखवून माझ्या मुलीवर बलात्कार केला. आरोपी अटक झाले खरे पण आरोपींचे घरचे डोळे वटारून मुलीकडे पाहू लागले. त्यामुळे माझी मुलगी तणावात आली. आता आमच्या घराला पोलीस संरक्षण द्यावे. मुख्यमंत्री-गृहमंत्री फडणवीस साहेबांनी प्रकरणाची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी पीडितेच्या आईने केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!