‘मला नरेंद्र मोदीच काय कोणच संपवू शकत नाही’
पंकजा मुंडे अस का म्हणाल्या, पंकजांचा नेमका कोणाला इशारा
बीड दि २७(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर भाजपात अडगळीत पडलेल्या नेत्या पंकजा मुंडे यांनी थेट नरेंद्र मोदींनाच आव्हान दिले आहे. मोदीना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण मला कोणी संपवू शकत नाही. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी थेट मोदींना आव्हान दिले आहे. पंकजा मुंडे यांच्या या भुमीकेमुळे अनेक तर्क लढवले जात आहेत.
भाजपाने नेहमीच घराणेशाहीविरोधात आवाज उठवला आहे. अर्थात भाजपात मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे. यावर बोलताना पंकजा म्हणाल्या की, “काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणी संपवू शकतं नाही. मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला, तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर मला कोणीही संपवू शकत नाही सांगत आपल्याला जनतेचा पाठिंबा असल्याचे हायकमांडला इशारा दिला आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदींनाच आव्हान दिल्यामुळे अनेक तर्क लढवले जात आहेत. मोदींना आव्हान देत पंकजा मुंडे भाजप सोडणार की दबाव टाकत पक्षाकडून विधान परिषदेवर जागा पक्की करणार का? कारण प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडेंनी बीडचे पालकमंत्री व्हावे अशी इच्छस व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे अडगळीत पडल्या आहेत. काही दिवसापूर्वी त्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी देण्यात आली आहे. पण त्यांना राज्याच्या राजकारणात रस असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी मोदींच्या अडून फडणवीसांना आव्हान दिल्याची चर्चा आहे.पण यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.