Latest Marathi News
Ganesh J GIF

दम असेल तर… पासून दारुची बाटलीचा बार्शीत कलगीतुरा

आमदार राऊत, दिलीप सोपल यांच्यात आरोप प्रत्यारोप, बघा कोण काय म्हणाले

बार्शी दि ३(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील राजकारणात सोपल आणि आमदार राऊत यांचे विळ्याभोपळ्याचे नाते आहे. त्यांच्यातील राजकीय संघर्षाला हिंसक घटनांचीही किनार आहे. त्यांच्यात सतत वाद होत असतात. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने सोपल आणि राऊत यांच्यात एकमेकांना आव्हान दिले जात आहेत.त्यामुळे बार्शीचे वातावरण ढवळून निघाले आहे.

आर्यन शुगरच्या माध्यमातुन सोपलांवर आरोप करताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, सोपल यांनी आपल्या कुटुंबाची व्यवसायाच्या माध्यमातून स्पर्धा करावी असे आव्हान दिले आहे. आज राऊत परिवाराची जी संपत्ती आहे ती कष्टातुन कमावलेली आहे. आम्ही कोणाला लबाडुन कमावलेली नाही.किंवा शेतकऱ्यांचे पैसेही बुडवलेले नाहीत तुम्ही फक्त शेतकऱ्यांना आणि बार्शी तालुक्यातील जनतेला लुबाडले आहे. आमच्या व्यवसायाशी स्पर्धा करा तुमच्यापेक्षा जास्त दर आम्ही शेतकऱ्यांना देऊ असे म्हणत सोपल यांनी बार्शीच्या जनतेला लुबाडल्याचा आरोप राऊत यांनी केला. या आरोपांना उत्तर देताना दिलीप सोपल म्हणाले की, राऊत यांनी व्यवसायाचे आव्हान अंबानी अदानीला द्यावे तुमच्याशी स्पर्धा करायची झाल्यास मला पहिल्यांदा दारुची भट्टी टाकावी लागेल कारण तोच त्यांचा व्यवसाय आहे. यासोबतच मला जुगार मटका रेशन पळवणे असे व्यवसाय करावे लागतील असे उत्तर दिले आहे. आम्ही कोणाचा रुपयाही बुडवलेला नाही तसे असते तर आमच्याविरोधात गुन्हे दाखल झाले असते असा टोला सोपल यांनी लगावला आहे.

बार्शी तालुक्यात पहिल्यापासूनच राऊत आणि सोपल संघर्ष राहिलेला आहे. दोघांनी पक्ष बदलले पण खरी लढत सोपल विरुद्ध राऊत अशी राहिलेली आहे. मध्यंतरी ईडीची धमकी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिली होती. त्यामुळे निवडणूका जवळ आल्याने दोघांमध्ये राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!