
लग्नास नकार दिल्याने प्रियकराचे महिलेसोबत धक्कादायक कृत्य
अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच, परिसरात खळबळ, बघा नेमक काय झाल
कोल्हापूर दि ३(प्रतिनिधी)- लग्नास नकार दिल्याने कोल्हापुरात एका महिलेचा खून करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. लग्नाचा प्रस्ताव ठोकरून पैशासाठी तगादा लावल्यामुळे प्रियकरानेच तिचा खून केला आहे.या हत्येमुळे खळबळ उडाली आहे.
कविता प्रमोद जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे,तर तिचा प्रियकर संशयित आरोपी राकेश शामराव संकपाळ याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कविता जाधव ही कसबा तारळे येथे राहते. त्यांना दोन मुली व एक मुलगा असून पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. राधानगरी येथे मावसभावाच्या फुटवेअर दुकानात त्या कामास होत्या, त्यांचे नात्यातील अविवाहीत राकेश संकपाळ याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. विशेष म्हणजे नातेवाईकांना याची कल्पना होती.राकेश कविताला सतत लग्न करण्याचा तगादा लावत होता. पण कविता नकार देत असल्याने दोघात वाद होत होते. घटनेच्या दिवशी राकेशने घरी आई-वडील नसताना कविताला बोलावून पुन्हा लग्नाचा विषय काढला. तिने तीन मुल असल्यामुळे लग्नाला नकार दिल्यावर चिडलेल्या राकेशने चाकूने सपासप वार करून तिचा खून केला. पोलिसांनी राकेशला अटक केली आहे.
कविता यांच्या जाण्याने त्यांची मुले पोरकी झाली. मोठी मुलगी फार्मसीचे शिक्षण घेत असून तिला उच्चशिक्षण देण्याची कविता यांची इच्छा होती. त्या राकेशला भेटून मुलीला भेटण्यासाठी जाणार होत्या. मात्र, नियतीने त्यांची भेट होऊ दिली नाही. इतक्या निर्घृणपणे खून झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात होती.