शिवसेनेचे तीन खासदार, चार आमदार शिंदे गटात येणार?
'या' खासदाराचा मोठा दावा, ठाकरे गटाला म्हणाले 'शिल्लक सेना'
मुंबई दि ३(प्रतिनिधी) – एकीकडे पक्ष, संघटना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कामाला लागले असतानाच शिंदे गट त्यांना जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेतील आणखी काही खासदार आणि आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा दावा एका खासदाराने केला आहे.
शिवसेनेमध्ये उरलेल्या आमदारांपैकी चार आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून तीन खासदार लवकरच शिंदे गटामध्ये सामील होणार असल्याचा दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे. निवडणूक आयोग काय निर्णय देणार यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. धनुष्यबाण आम्हाला १०० टक्के मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही शिवसेना गडनेत्यांचा मेळावा पाहिला तर तिथ सुद्धा किर्तीकर यांनी भाजपासोबत युती करण्याची मागणी केली आहे. यावरून तिकडचे अनेक आमदार खासदार इकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. जर धनुष्यबाण आमच्याकडे आला तर तिकडे काहीच शिल्लक राहणार नाही एवढी गोष्ट नक्की आहे, असा मोठा दावाही जाधव यांनी केला आहे. सध्या शिंदे गटात ४० आमदारांबरोबर १२ खासदार देखील आहेत. विधीमंडळ पातळीवर एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत आहे.
शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये शक्तिप्रदर्शनाची चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. टिझरच्या माध्यमातून दोघेही एकमेकांवर निशाना साधत आहेत पण शिंदे गट ठाकरेंबर कोंडी करताना दिसत आहे.