
रांची दि ८(प्रतिनिधी)- लग्न करण्यास नकार दिल्याने एका विवाहित तरूणाने एका तरुणीला अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना झारखंडमध्ये घडली आहे. या हल्ल्यात मुलगी इतकी भीषण भाजली गेली की काही तासातच तिचा मृत्यू झाला. अंकिता हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती दुमका येथे घडली आहे. मारुती असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मारुती ही भरतपूर टोला गावात आजी-आजोबा आणि मामासोबत राहत होती. नुकतेच ती शालेय परीक्षा पास झाली होती. त्यामुळे ती दुमका येथे काॅलेजचे शिक्षण घेत होती. सोबतच मारुती जरमुंडीच्या कौशल्य विकास केंद्रात शिवणकामही करत होती. २०१९ मध्ये मारुतीची भेट राजेश राऊत नावाच्या व्यक्तीशी झाली होती.पण राजेशचे लग्न झाल्यानंतर मारुतीने त्याच्याशी बोलणे बंद केले.पण राजेश मारुतीवर लग्नासाठी सतत दबाव टाकत होता. राजेशने लग्न न केल्यास मारुतीला जिवंत जाळण्याची धमकी दिली. पण मारुतीने दुर्लक्ष गेल्याने घटनेच्या दिवशी राजेशने मारूतीच्या घरी जात तिच्या अंगावर पेट्रोल टाकले. तिला काही समजण्याआधीच राजेशने मारुतीला पेटवून टाकलं आणि तेथून पळ काढला. तिने आरडाओरडा केल्यानंतर आजी मदतीसाठी आली पण तोपर्यंत ती पूर्ण भाजली होती. अखेर उपचार सुरु असताना तिची प्राणज्योत मालवली.
मारुती ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे आई-वडील भैरवपूरमध्ये राहतात. त्यांची आर्थिक स्थिती उत्तर नसल्याने ती भरतपूर टोला गावात आजी-आजोबा आणि मामासोबत राहत होती. काहीच महिन्यात तिचं लग्न होणार होते.पण त्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला.