Latest Marathi News

अपघात होताच बसने पेट घेतल्याने प्रवाशांचा होरपळून मृत्यू

नाशिक-औरंगाबाद मार्गावर बर्निंग कारचा थरार, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर

नाशिक दि ८(प्रतिनिधी)- नाशिक -औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात एक खासगी बस जळून खाक झाली. ही आग एवढी भीषण होती की त्यात १४ पेक्षा अधिक प्रवाशांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला. पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला. त्यात बसचालकाचाही मृत्यू झाला. ही बस यवतमाळहून मुंबईला चालली होती. बसमध्ये ३० पेक्षा अधिक प्रवाशी प्रवाशी होती. मुख्यमंत्र्यांनी मृतांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.

औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात आयशर ट्रक आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला. यात ट्रकची डिझेल टाकी फुटून सर्वत्र डिझेल पसरले तर दुसरीकडे बस दुस-या चारचाकीला धडकली. त्यानंतर बसमध्ये स्फोट होऊन आग लागली. अनेक प्रवाशी पहाटे झोपेत असल्याने काही समजण्याच्या आतच त्यांचा भाजून मृत्यू झाला. घटनास्थळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर अग्निशमन दलाचे केंद्र असतानाही प्रत्यक्षात मदत पोहोचण्यासाठी तब्बल एक तास लागला. आधी पोलीस, त्यानंतर अग्नीशमन आणि नंतर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत स्थानिक नागरिक आणि या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी मदतकार्य सुरू केले होते. मात्र, आग एवढी भीषण होती की, मदतीसाठी याचना करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.मृतांमध्ये १० पुरुषांचा समावेश आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघात घडल्यानंतर बसने पेट घेतला त्यावेळेचा लाइव्ह व्हिडिओ समोर आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च देखील राज्य सरकारकडून केला जाईल असे त्यांनी सांगितले आहे. तसेच पालकमंत्री आणि प्रशासकीय अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. आगीच्या घटनेमुळे अपघाताच्या ठिकाणी मन हेलावणारड वातावरण तयार झाले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!